थिरुअनंतपूरमध्ये इमारतीला भीषण आग

केरळ- केरळ राज्यातील थिरुअनंतपूरम येथे एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील एमजी रोड परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पाच अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचल्या असून, जवानांकडून बचाव कार्य सुरु आहे.

दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती हाती येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.