आसाममध्ये राज्य परिवहन निगमच्या आगाराला पेटवले

ईशान्य भारतात आंदोलनाला हिंसक वळण 

डिब्रूगढ़-  ईशान्य भारतात नागरिक कॅब आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आसाम राज्यातील डिब्रूगढ़मध्ये आंदोलनकर्त्यांनी राज्य परिवहन निगमच्या आगाराला आग लावली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले कि, मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते बस आगारात पोहचले आणि त्यांनी आगाराची तोडफोड करून आगाराला आग लावली.

घटनास्थळी अग्निशन दल, सेनेचे जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीत जीवित हानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. अतिरिक्त आयुक्त तसेच प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थकी दाखल झाले असून परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत.

राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. गुवाहाटीत आंदोलनकर्ते आणि पोलिसात झालेल्या चकमकीत दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.