पुण्यात साडी सेंटरला भीषण आग; ५ कामगारांचा होरपळून मृत्यू

पुणे – देवाची उरुळी येथील राजयोग साडी सेंटर या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. या आगीत दुकानाला बाहेरुन कुलूप लावले असल्याने आतमध्ये झोपलेल्या ५ कामगारांचा गुदमरुन आणि होरपळून मृत्यु झाला. ही घटना पहाटे साडेचार वाजता घडली.

हडपसर-सासवड रोडवरील देवाची उरळी येथे राजयोग साडी सेंटर आहे. या दुकानातील ५ कामगार दुकानात झोपले होते. दुकानाला बाहेरुन कुलूप लावण्यात आले होते. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे दुकानाला आग लागली. पण दुकानाला बाहेरुन कुलूप लावले असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. त्यांनी मॅनेजरला फोन करुन आगीची माहिती दिली. पहाटे ४ वाजून ३३ मिनिटांनी अग्निशामक दलाला याची माहिती मिळाली. तातडीने ५ गाड्या घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुमारे तास भराच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात आली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.