येरवडा – येरवडा बाजारातील वांबुरे इमारतीच्यासमोर असलेल्या महावितरणच्या डीपी बॉक्सला सकाळी 11 च्या सुमारास आग लागली होती.डीपी बॉक्समधुन धुर येत असल्याचे येथील स्थानिक नागरिकांच्या वेळेच लक्षात आल्याने त्यांनी लागलीच महाविरतणला कळविले.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/294614545682759
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या डीपी बॉक्सला जोडणारा विद्युतप्रवाह खंडीत करुन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत डीपी बॉक्समधील संपुर्ण वायरिंग जळाली होती.या डीपीवर विजेच्या मिटरचा अतिरिक्त भार पडल्याने डीपी जळाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
अनेक जण परवानगी नसतानाही येथुन नकळत वीज जोडणी घेत आहेत.वीज जोडणी घेताना महावितरणला कळविले जात नाही.या वीजेचा वापर व्यावसायासाठी केला जात आहे.महावितरणने अनधिकृत वीज कनेकश्न घेणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकानी केली आहे.डीपी बॉक्सला आग लागली तेव्हा बाजारात जास्त वर्दळ नव्हती तसेच ती वेळेवर लक्षात आल्याने मोठी हानी झाली नाही. मात्र भविष्यात ही हानी होवु नये यासाठी डीपी बॉक्समधुन आवश्य्क तेवढीच कनेकश्न द्यावीत असेही स्थानिकानी सांगितले.