भदोही – उत्तरप्रदेशात येथील एका दुर्गा पूजा मंडपात हॅलोजन लाइट जास्त तापल्याने त्यातून मंडपाला मोठी आग लागली. या आगीत तीन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आणि 64 जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री आग लागली तेव्हा नाथुआ गावातील या मंडपात डिजिटल शो सुरू होता. ही दुर्घटना घडली त्यावेळी तेथे किमान तीनशे जण उपस्थित होते.
अतिरिक्त महासंचालक राम कुमार यांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने आगीचे कारण शोधून काढले. कार्यक्रमाच्या आयोजनात निष्काळजीपणा आढळल्याने संबंधित पूजा समितीच्या सदस्यांविरुद्ध औराई पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला, जखमींना योग्य उपचार मिळतील याची काळजी घेण्याचे निर्देश आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.