भोसरीतील गॅस पुरवठा केंद्राला आग

पिंपरी  – भोसरी एमआयडीसीमध्ये एका गॅस सप्लाय स्टेशनमध्ये झालेल्या गॅस गळतीमुळे भीषण आग लागली. अग्निशामक दलाने तातडीने आग आटोक्‍यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग शनिवारी सकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

भोसरी एमआयडीसी येथील अनंत इंटरप्राइजेसच्या गॅस सप्लाय स्टेशनला आग लागल्याची माहिती समजाताच संत तुकाराम नगर येथील अग्निशमन केंद्राचे दोन बंब आणि भोसरी उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी तातडीने दाखली झाला. गॅसला आग लागलेली असल्यामुळे हवेमध्ये पसरलेल्या ज्वलनशील वायूमुळे हवेत आगीचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले होते. सुरूवातीला जवांनानी पंधरा ते वीस मिनिटे कूलिंग करण्याचे काम केले.

त्यानंतर या आगीची माहिती एमएनजीएल कंपनीला दिल्यानंतर त्यांनी इनलेट गॅस बंद केला. त्यानंतर ही आग आटोक्‍यात आली. या आगीत कंपनीचे किती रुपयाचे नुकसान झाले ही माहिती मिळू शकली नाही. आज लागलेल्या आगीच्या घटनांमुळे या केंद्राच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.