नवी दिल्ली – दिल्लीतील एम्स रूग्णालयाला आज आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग रुग्णालयाचा पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, एम्स रूग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात इलेक्ट्रिकचे काम सुरू आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, एम्स रुग्णालयातील इमरजन्सी लॅबजवळ ही आग लागली आहे. आगीच्या घटनेमुळे ही लॅब बंद करण्यात आली आहे. तसेच रूग्णालयात कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीर सुरू आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.