‘तांडव’विरोधात हजरतगंज पोलिसांत FIR; उत्तर प्रदेश पोलीस मुंबईकडे रवाना

मुंबई ( Tandav controversy ) – अभिनेता सैफ अली खान याची मुख्य भूमिका असलेली ‘तांडव’ वेब-सिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ‘तांडव’ सिरीजमध्ये दाखवण्यात आलेली दृष्य हिंदू देवी-देवतांचा अपमान करणारी असून यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आलाय. भाजप नेते राम कदम यांनी ‘तांडव’ विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती.

अशातच आता, तांडव विरोधात उत्तर प्रदेशातील हजरतगंज पोलिसांत देखील FIR दाखल करण्यात आली आहे. याबाबत हजरतगंजचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ यादव यांनी तक्रार दिली असून यामध्ये तांडवचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, लेखक गौरव सोळंखी व अमॅझॉन इंडियाच्या वरिष्ठ अधिकारी अपर्णा पुरोहित यांच्यावर ‘हिंदू देवी-देवतांचा अपमान करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न’ करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठीउत्तर प्रदेश पोलिसांची एक तुकडी मुंबईकडे रवाना झाली आहे. एका नामांकित वृत्तसंस्थेने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ‘तांडव सीरिजविरोधात दाखल करण्यात आलेय FIR ची चौकशी करण्यासाठी चार पोलिसांची एक तुकडी मुंबईकडे रवाना झाली आहे. पोलीस FIR मध्ये नाव असलेल्या दिग्दर्शक अली अब्बास जफर, लेखक गौरव सोळंखी व अमॅझॉन इंडियाच्या वरिष्ठ अधिकारी अपर्णा पुरोहित यांची चौकशी करेल.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.