श्‍वानाच्या मृत्यूप्रकरणी पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल

पिंपरी – नसबंदीसाठी आणलेल्या श्‍वानाकडे व्यवस्थित लक्ष न दिल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदाराचा पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना टेल्को रोड जवळील
केंद्रात घडली.

ऍन्सन ऍन्यनी पालकर (वय 33, रा. नांदे रोड, म्हाळुंगे, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सीपीसीए कंपनीचे पर्यवेक्षक बापू पाटील (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर ते 16 ऑक्‍टोबर या कालावधीत आरोपी पाटील यांनी टेल्को रोडवरील अनुकूल कंपनी जवळील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या श्‍वान नसबंदी केंद्रात आणलेल्या श्‍वानांकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही.

यामुळे एका श्‍वानाचा जाळीत अडकून मृत्यू झाला. त्यांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पाटील याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. टी. शेडगे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.