फिनआयक्‍यू- सायबेज अंतिम लढत रंगणार 

तिसरी एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धा 

पुणे,- फिनआयक्‍यू संघाने केपीआयटी संघाचा, तर सायबेज संघाने सनगार्ड एएस संघाचा पराभव करताना तिसऱ्या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. राजेश वाधवान समूह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटीतर्फे व नेस्टअवे, फास्ट अँड अप, स्कार्टर्स, मॅकडॉनडल्स, झुमकार, उबेर इट्‌स, रॅडिसन ब्लू (हिंजेवाडी) यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मामुर्डी येथील एफसी पुणे सिटीच्या सराव मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील उपान्त्य फेरीच्या पहिल्या सामन्यात श्रीकांत मोलंगीकरच्या हॅटट्रिक कामगिरीच्या जोरावर फिनआयक्‍यू संघाने केपीआयटी संघाचा 5-1 असा दणदणीत पराभव करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. चारुदत्त चव्हाणने दोन गोल करताना त्याला सुरेख साथ दिली. दुसऱ्या उपान्त्य सामन्यात गौरव शिंघवीच्या एका गोलच्या बळावर सायबेज संघाने सनगार्ड एएस संघाचा 1-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
सविस्तर निकाल-

उपान्त्य फेरी- 1) फिनआयक्‍यू- 5 (श्रीकांत मोलंगीकर 6, 9 व 15वे मि., चारुदत्त चव्हाण 11 व 19वे मि.) वि.वि. केपीआयटी- 1 (हेमराज हूडा 13वे मि.), 2) सायबेज- 1 ( गौरव शिंघवी 14वे मि.) वि.वि. सनगार्ड एएस- 0.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)