अस्वच्छ लिंबू सरबत विक्रेत्या पाच लाखांचा दंड  

मुंबई: गेल्या काही दिवसापूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकावरील लिंबू सरबतवाल्याचा व्हिडीओ फेसबुक, व्हाटसअँप आणि अन्य सोशल मीडियावर तुफान वायरल झाला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं त्या अस्वच्छ लिंबू पाणी बनविणाऱ्या स्टोलवर कारवाई करत स्टोलला टाळं ठोकलं. नंतर या लिंबू सरबताची तपासणी झाल्यानंतर हे सरबत मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे या विक्रेत्याविरोधात ५ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेनं केलेल्या तपासणी नंतर या लिंबू सरबतामध्ये ई-कोलाय हे जिवाणू आढळून आले. त्यामुळे प्रवाशांना न्युमोनिया,मूत्राशयाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. म्हणून, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.