घर बांधकामातील दोष शोधताना (भाग-१)

गेल्या काही वर्षात गृहप्रकल्पांची संख्या प्रचंड वाढली आहे. वरवर आकर्षक दिसणारे गृहप्रकल्प हे आतून पोकळ असतात आणि याचा अनुभव अनेकांना आलेला असतो. दहा ते पंधरा वर्षांनंतर संबंधित इमारतीची स्थिती खूपच शोचनीय होते. टॉप फ्लोअरवर राहणाऱ्या रहिवाशांना तर पावसाळ्यात पाणी गळतीच्या समस्यांना कायमच सामोरे जावे लागते.

घर बांधकामातील दोष शोधताना (भाग-२)

दिनेश नावाच्या व्यक्तीला असाच अनुभव आला. तो काही दिवसांपूर्वीच नव्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेला. मात्र, कालांतरोने त्याला घराच्या भिंतीला चांगल्या रितीने प्लॅस्टर केलेले नसल्याचे आढळून आले. भिंतीला तडे जाऊ लागले. त्याचवेळी प्लंबिंगचे देखील काम निघू लागले. यासंदर्भात त्याने विकासकाकडे तक्रारी देखील केल्या. मात्र, त्याचे समाधान झाले नाही किंवा समाधानकारक उत्तर आले नाही. अर्थात अशा अनुभवांना सामोरा जाणारा दिनेश हा एकटाच नव्हता. त्यासारख्या अनेक मंडळींना अशा त्रासांना सामोरे जावे लागत होते. बांधकामाच्या रचनेत असलेल्या दोषाचा फटका अनेकांना बसत होता. विशेष म्हणजे आपण बांधकामाच्या काळात फ्लॅटला नियमित भेट देत असतो, तरीही या गोष्टी आपल्याला कळत नाही. म्हणून जोपर्यंत आपण घरात राहण्यासाठी जात नाहीत, तोपर्यंत अशा उणिवा लक्षात येत नाहीत. असे कितीतरी खरेदीदार असतात की, त्यांना नव्या घरात गेल्यानंतर त्यांना बांधकामातील निष्काळजीपणाचा फटका सहन करावा लागत असतो.

खरेदीदारांना घराचा ताबा लवकर हवा असतो आणि त्यामुळे विकासकावर गृहप्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा दबाव असतो. अशावेळी प्रत्येक विकासक बांधकाम करताना दर्जा राखण्याबाबत नेहमीच सजग राहीलच असे नाही. भिंत, स्लॅबचे वॉटरिंग तब्बल पंधरा ते वीस दिवस आवश्‍यक असताना ते चार-पाच दिवसातच आटोपले जाते. परिणाम बांधकामात त्रुटी राहतात आणि भविष्यात त्याचा त्रास उद्‌भवत राहतो. एका सर्व्हेक्षणानुसार देशात सुमारे 84 टक्के रिअल इस्टेट ग्राहकांना घराच्या दर्जाची तपासणी कोणत्या रितीने केली जाते, याची कल्पनाच नाही. सर्व्हेक्षणात सहभागी होणाऱ्या केवळ 16 टक्के ग्राहकांना घराचा दर्जा कसा तपासावा याची माहिती आहे. या आकडेवारीवरून एक बाब स्पष्ट होते की, खरेदीदार बांधकामातील उणिवांचा शोध लावू शकत नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.