पुणे – यापूर्वी व्हॉट्सऍपवर फक्त मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्याची सुविधा होती. त्यानंतर वेळोवेळी यूजर्सचा अनुभव अधिक मजेदार बनवण्यासाठी कंपनी या ऍपवर वेगवेगळे अपडेट्स आणत राहिली, ज्यामुळे हे ऍप लोकांमध्ये अधिक लोकप्रिय झाले. आता व्हॉईस मेसेज, व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल याशिवाय ऑनलाइन पेमेंटची सुविधाही उपलब्ध आहे. सध्या व्हॉट्सऍपचा वापर केवळ वैयक्तिकच नाही तर व्यावसायिक कामांसाठीही केला जात आहे. यामुळेच व्हॉट्सऍप हे लोकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग ऍप आहे.
आजच्या काळात प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्याच्या मोबाईलमध्ये हे ऍप नक्कीच असेल. अशा परिस्थितीत, व्हॉट्सऍप आपल्या सामान्य वापरकर्त्यांसाठी तसेच व्यवसाय खाते वापरकर्त्यांसाठी वेळोवेळी नवीन फीचर्स लाँच करत असते. अलीकडेच, कंपनीने व्हॉट्सऍप बिझनेस खात्याच्या वापरकर्त्यांसाठी असे एक आश्चर्यकारक फिचर जारी केले आहे, ज्यानंतर या ऍपवरील वापरकर्त्यांचा अनुभव अधिक मजेदार होईल. चला तर, जाणून घेऊया या नवीन अपडेटबद्दल.
– रिपोर्टनुसार, व्हॉट्सऍपने नुकतेच असे एक फीचर लॉन्च केले आहे, जे गुगल सर्चप्रमाणे काम करेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फीचर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या रेस्टॉरंट्स आणि किराणा दुकानांबद्दल सांगेल.
– व्हॉट्सऍपच्या या फीचरचे नाव ‘बिझनेस डिरेक्टरी’ आहे. याद्वारे, व्यवसाय खाते वापरकर्ते ऍपवर स्थानिक रेस्टॉरंट्स आणि किराणा दुकानांचा शोध घेऊ शकतील.
– हे फिचर कोठे सुरू झाले?
हे फिचर प्रथम ब्राझीलमध्ये रिलीझ करण्यात आले. तिथल्या यशानंतर ते सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अद्याप हे फीचर भारतात सुरू झालेले नाही.
-कसे चालेल?
रिपोर्टनुसार, जेव्हा तुम्ही व्हॉट्सऍपच्या बिझनेस अकाउंटवर सर्च ऑप्शनवर जाल तेव्हा ‘बिझनेस नियरबाय’ नावाचा नवीन सेक्शन दिसेल. यामध्ये तुम्हाला श्रेणी निवडावी लागेल. यानंतर, तुम्ही जे काही शोधले आहे, ते फिल्टर केले जाईल आणि तुमच्या समोर येईल. त्याच्या मदतीने तुम्ही त्या रेस्टॉरंट किंवा दुकानात सहज पोहोचू शकता.