जाणून घ्या, आजचा शोध : टेलिफोनचा डायलिंग पॅड

आजच्या दिवशी 1963 साली जगाने पहिल्यांदाच अनुभवले की, बटणाचा टेलिफोन कसा असतो. आज आपण बटणाच्या फोनवरून टच स्क्रीन फोनपर्यंत पोहोचलो आहोत. शास्त्रज्ञ सध्या असा प्रयत्न करीत आहेत की, टच करण्याचीसुद्धा गरज भासू नये. केवळ बोटांच्या इशाऱ्याने फोन चालला पाहिजे.

फार जुनी गोष्ट नाहीये, जेव्हा गोल चक्रासारखा डायलिंग पॅड वापरात होता. ज्यावर एक नंबर फिरवल्यावर दुसऱ्या नंबरसाठी चक्र थांबण्याची वाट पाहावी लागत असे. दरम्यान, 18 नोव्हेंबर, 1963 रोजी अमेरिकी टेलिफोन कंपनी बेल सिस्टम्सने जगासमोर पहिल्यांदाच असा टेलिफोन आणला ज्यावर बटण असलेला डायलिंग पॅड होता.

बटण असलेला पहिला व्यावसायिक टेलिफोन पेनसिल्वेनिया येथे वापरण्यात आला. ग्राहकांना सुरुवातीला यावर विश्‍वास ठेवणेच मुश्‍कील झाले होते की, नंबर केवळ बटण दाबून डायल करता येतो.

सुरुवातीला बटणाच्या फोनवर 10 बटण होते. पुढे या बटणांची संख्या वाढवण्यात आली. पाच वर्षांनंतर 1968 साली एस्ट्रिस्क (*) आणि हॅश (#) हे बटण दिले गेले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.