पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…
1. देशातील तरुणांना अराजकतेच्या परिस्थितीची चीड
मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन
2. सरकारची माघार : सर्व राज्यांशी चर्चा करून एनआरसी लागू करणार
केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांची माहिती
3. उत्तर भारतात थंडीची लाट
दिल्लीसह सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
4. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पेटला
कर्नाटकात कनसेकडून मराठी पाट्यांची तोडफोड तर दोन्ही राज्यातील बस सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद
5. बालकांचा मृत्यू होणं यात काही नवं नाही
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे असंवेदनशील वक्तव्य
6. भारत माता की जय बोलतील तेच लोक भारतात राहतील
केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांचे वादग्रस्त वक्तव्य
7. राज्य मंत्रिमंडळाचा उद्या होणार पहिला विस्तार
शिवसेना 13, राष्ट्रवादी 13 आणि कॉंग्रेसचे 10 मंत्री घेणार शपथ
8. महाराष्ट्रात देखील कन्नड लोक राहतात हे त्यांनी लक्षात ठेवावे
शिवसेनेचा कर्नाटक सरकारला इशारा
9. वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक
अमृता फडणवीस यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका
10. अखेर गुल मकई चित्रपटच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला
नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझईच्या जीवनावर आधारित आहे चित्रपट