केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर अनेक कल्याणकारी आणि फायदेशीर योजना राबवतात. या योजनांचा उद्देश गरजू आणि गरीब लोकांना लाभ देणे हा आहे. आजही आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लोक गरीब वर्गाखाली जीवन जगत आहेत. अशा परिस्थितीत या लोकांना मदतीची गरज आहे. त्यामुळेच सरकार वेळोवेळी आर्थिक लाभापासून ते आरोग्य योजनांपर्यंत अनेक योजना राबवते. अशीच एक योजना केंद्र सरकार राबवत आहे, ती म्हणजे ई-श्रम कार्ड योजना. यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक फायद्यासोबतच इतर अनेक फायदे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर या कार्डधारकांच्या खात्यावर सरकारने पहिला हप्ता पाठवला आहे, मात्र दुसरा हप्ता कोणाला मिळणार आहे, याबद्दल अधिक जाणून घेऊया.
* ‘या’ लोकांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे पैसे आले आहेत.
पहिल्या हप्त्याच्या पैशांबाबत बोलायचे झाले तर, ई-श्रम कार्डधारकांच्या बँक खात्यावर एक हजार रुपयांचा पहिला हप्ता शासनाकडून पाठविण्यात आला. ज्या कार्डधारकांनी 31 डिसेंबरपूर्वी ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदणी केली होती त्यांना या हप्त्याचा लाभ मिळाला.
* पुढच्या हप्त्याचे पैसे कोणाला मिळणार?
सरकारने आधीच जाहीर केले आहे की, ई-श्रम कार्ड योजनेअंतर्गत ते कामगारांच्या बँक खात्यात दरमहा ५०० रुपये पाठवणार आहेत. मात्र या योजनेनुसार ज्या कामगारांनी अद्याप कामगार विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा कामगारांनाच याचा लाभ मिळणार आहे.
* जर कार्ड बनवले नसेल तर असे बनवा
तुम्ही अजून तुमचे ई-श्रम कार्ड बनवले नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकसेवा केंद्र, CSC किंवा पोस्ट ऑफिसला भेट देऊन या कार्डसाठी नोंदणी करू शकता. याशिवाय, तुम्ही eshram.gov.in या ई-श्रम विभागाच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन स्वतःची नोंदणी देखील करू शकता.
* हप्ता मिळाला की नाही? या प्रकारे तपासा:-
– पहिला मार्ग
ई-श्रम कार्ड योजनेंतर्गत मिळालेला पहिला हप्ता तुमच्या बँक खात्यात पोहोचला आहे की नाही हे अद्याप तुम्हाला माहीत नसेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या ATM ला भेट देऊन ते तपासू शकता. तुम्हाला एटीएम मशीनमधून मिनी बँक स्टेटमेंट काढावे लागेल, ज्यामध्ये तुम्हाला समजेल की खात्यात पैसे आले आहेत की नाही.
– दुसरा मार्ग
तुम्हाला एटीएममध्ये जायचे नसेल, तर ऑनलाइन बँकिंगमधील स्टेटमेंट पाहून तुम्हाला हप्ता मिळाला आहे की नाही हे कळू शकते. याशिवाय, तुम्ही तुमच्या पासबुकमध्ये एंट्री करून देखील हे जाणून घेऊ शकता.