कर आकारणीत विलंब : ऍड. पोटरे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
बारामती – नगरपरिषदेच्या चतुर्थ कर आकारणीस विलंब झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या आर्थिक नुकसान झाले आहे. आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अन्यथा याबाबत न्यायालयात जाणार असल्याचा इशारा ऍड. श्याम सुंदर पोटरे यांनी दिला आहे. त्याबाबतचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
नगरपरिषदेने नवीन दरांची रचना वेळेत केली नाही, त्यामुळेच 2018-19 या वर्षासाठी चतुर्थ वार्षिक घरपट्टी आकारणी विलंब झाला आहे, असा ठपका पोटरे यांनी ठेवला आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान झाले आहे. चतुर्थ कर आकारणी संदर्भात प्रशासनाने दिरंगाई केले आहे. नगराध्यक्ष तसेच नगरसेवक यांनी देखील याबाबत कोणत्याही पाऊल उचलले नाही. त्यामुळे प्रशासन व नगरपरिषदेचे कारभारी यांच्यात ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे.
आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी –
त्यामुळे नगरपरिषद झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी पोटरे यांनी केली आहे. याबाबत कारवाई होऊन आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित न झाल्यास आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे पोटरे यांनी स्पष्ट केले आहे.
चतुर्थ कर आकारणी प्रकरणी लागणारी सर्व कागदपत्रे नगरपरिषदेने नगररचना विभागाकडे वेळेत दिली होती;मात्र वेळोवेळी पाठपुरावा करून देखील नगररचना विभागाकडून याबाबत प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कर आकारणीचे विलंब होत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आले आहे. नगरपरिषदेची यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही.- योगेश कडूसकर, मुख्याधिकारी