पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मार्च एप्रिल पासून आयोजित केल्या जाणाऱ्या परिक्षांकरिता विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायांकितप्रत (स्कॅन प्रत / फोटोकॉपी) प्राप्त करण्यासाठी व पुनरमूल्यांकन करण्यासाठी खलील प्रमाणे शुल्कामध्ये वाढ करण्यात आलेला आहे.
- अव्यवसायिक अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपी साठी ₹१०० वरून ₹१५० फी वाढ करण्यात आलेली आहे.
- व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपी साठी ₹१५० वरून ₹२०० फी वाढ करण्यात आलेली आहे.
- अव्यवसायिक अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकेच्या पुनरमूल्यांकनासाठी ₹ १५० वरून ₹२०० अशी वाढ करण्यात आलेली आहे.
- व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकेच्या पुनरमूल्यांकनासाठी ₹ २०० वरून ₹ २५० अशी वाढ करण्यात आलेली आहे.
सदर विषयामध्ये फी वाढ त्वरित थांबवावी व विद्यार्थ्यांकडून जुन्या नियमानुसार शुल्क आकारण्यात यावे या मागणीचे निवेदन आज दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सा. फु. पुणे विद्यापीठ परीक्षा विभाग संचालकांना अभाविपच्या वतीने निवेदन देण्यात आले.
येत्या १० दिवसांमध्ये शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही तर अभाविप तीव्र आंदोलन करेन असा इशारा देण्यात आला , यावेळी अभाविपचे योगेश्वर राजपुरोहित , दयानंद शिंदे , तुषार काहूर , शांभवी साले , विनोद वाघ , प्रतीक धायगुडे आदी उपस्थित होते.