बनावट एटीएमद्वारे आर्थिक फसवणूक 

पिंपरी – एसबीआय बॅंकेच्या नवी सांगवी येथील शाखेच्या ग्राहकांच्या एटीएमचे क्‍लोनिंग (बनावट कार्ड तयार करणे) करुन वेगवेगळ्या ठिकाणच्या एटीएममधून 1 लाख 62 हजार 700 रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी, एसबीआय बॅंकचे नवी सांगवी येथील शाखाप्रबंधक नीलम कुमारी (वय-33, रा.पिंपळेगुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी सांगवी येथील एसबीआय बॅंकेमध्ये स्नेहल चौगुले, प्रमोद शिंदे, आशिष कांबळे, अर्चना शेलार, मोहन केशव ताजणे यांचे खाते आहे. त्यांच्या एटीएम कार्डचे अज्ञात इसमाने क्‍लोनिंग केले व बनावट एटीएम वापरुन बांद्रा, भिवंडी, देवघर (झारखंड), गणेश हॉटेल, पुणे, सदाशिव पेठ याठिकाणच्या एटीमधून सर्वांच्या खात्यावरील 1 लाख 62 हजार 700 रुपये काढून घेऊन फसवणूक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.