- शिक्षक भरतीसाठी खोटी कागदपत्रे तयार करून लाखोंचे व्यवहार
पुणे – शिक्षक भरतीसाठी खोटी कागदपत्रे तयार करत अधिकऱ्यांशी संगनमत करून लाखो रुपयांचे व्यवहार केल्याप्रकरणी गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सहा ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.
या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या एका मुख्याध्यापकाच्या घरीही पोलिसांनी छापे टाकले. संभाजी शिरसाट असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. पिंपरी-चिंचवडमधील राजे शिव छत्रपती प्राथमिक विद्यालयाचे ते मुख्याध्यापक आहेत. तर, इतर ठिकाणी छापे टाकलेल्या व्यक्ती या संशयित आहेत.
शिक्षकांच्या बनावट मान्यता तयार करून त्यांना वेतन सुरू करण्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्यभरातील शिक्षक भरतीची चौकशी सुरू करण्यात आली. यामध्ये पुण्यातील जिल्हा परिषदेच्या भरतीबाबतही चौकशी करण्यात आली.