दिल्लीत आर्थिक जनगणनेस प्रारंभ

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सातव्या आर्थिक जनगणनेला शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत “कॉमन सर्व्हिस सेंटर’ (सीएससी) या “एसपीव्ही’शी करार केला आहे.

प्रथमच संपूर्ण जनगणना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एका ऍप्लिकेशनच्या सहाय्याने आयोजित केली जात आहे; जी अचूकता व डेटा सुरक्षितता सुनिश्‍चित करेल. दिल्ली हे 26वे राज्य आहे, जेथे सर्वेक्षण सुरू केले गेले आहे, तर 20 राज्यांमध्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशात प्रक्रिया सुरू आहे.

दिल्लीत संपूर्ण प्रक्रियेस सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. जेथे गणना करणारे सुमारे 45 लाख आस्थापने व घरांचे सर्वेक्षण करतील, अशी माहिती सीएसओचे महासंचालक (सामाजिक सांख्यिकी) ए. के. साधू यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.