पवनानगर (वार्ताहर) –सडवलीच्या घारे कुटुंबियाने विवाह समारंभातील अनाठायी खर्चाला फाटा देत करोनाग्रस्तांसाठी 25 हजार रूपयांचा धनादेश देऊन ग्रामीण भागात वेगळा आदर्श निर्माण करून ठेवला आहे.
सध्या संपूर्ण देशासह राज्य करोना आजाराच्या संकटात सापडला आहे. त्यामुळे अनेक सामाजिक कार्यक्रम, विवाह समारंभ रद्द करण्यात आले. त्यामुळे मोठ्या थाटामाटात होणारे विवाह सोहळे आणि त्यावर होणारा अनाठायी खर्च थांबला. स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, सामान्य नागरिक करोनाशी दोन हात करत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या मोजक्या नागरिकांच्या उपस्थीत घारे कुटुंबातील विवाह सोहळा झाला.
सडवली येथील नथु घारे पाटील यांच्या मुलीचा विवाह धामणे येथील रमेश शंकर गराडे यांच्या मुलाशी नुकताच झाला. सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. या वेळी सामाजिक बांधिलकी जपत नववधू आणि नवरदेवाच्या परिवाराने करोनाग्रस्तांसाठी 25 हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला.