सासवड – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी (दि. 22) सासवड येथे बूथ कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर एका कार्यकर्त्याने सीतारामन यांच्याकडे फोटो काढण्याचा आग्रह धरला; मात्र या मागणीवर सीतारामन चांगल्याच भडकलेल्या दिसल्या.
सासवड येथील बैठकीत केंद्रीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा, बाहेरून नोकरी व व्यवसायानिमित्त या मतदारसंघात आलेल्या मतदारांना संपर्क करून आपलेसे करा, असे आदेश सीतारामन यांनी कार्यकर्त्यांना दिले.
फोटो काढण्याचा आग्रह करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अर्थमंत्री सीतारामन भडकल्या; फोटोसाठी सकाळपासून थांबलं होतं कार्यकर्त्याचं कुटुंब
सविस्तर बातमी…
👇🏻👇🏻https://t.co/0e4jqbCTJa pic.twitter.com/H0QK2OGrDH— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) September 24, 2022
या बैठकीनंतर ज्या भाजपा कार्यकर्त्याच्या घरी ही बैठक झाली, त्यांच्या कुटुंबाला अर्थमंत्री सीतारमन यांच्यासह एका फोटो काढायचा होता. बैठक झाल्यावर त्या कार्यकर्त्याने सीतारमन यांच्याकडे विनंती केली की, मॅडम आमचे पूर्ण कुटुंब सकाळपासून तुम्हाला भेटण्यासाठी थांबले आहे. तुमच्यासोबत एक फोटो काढायचा आहे.
कार्यकर्त्याच्या या मागणीवर निर्मला सीतारमन चांगल्याच भडकल्या. त्यांनी कार्यकर्त्याला झापले आणि पुढील प्रवासासाठी निघून गेल्या. यावरती कार्यकर्त्याने सांगितलं की, माझ्या वडिलांपासून आम्ही भाजपाचे काम करत आहे. त्यामुळे निर्मला सीतारमन यांच्याकडे आम्ही फोटोसाठी आग्रह केला. याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.