Nirmala Sitharaman Saree । आज मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सभागृहात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साडीची चर्चा होते. यंदा देखील त्यांच्या खास साडीतील लूक समोर आहे. सातव्या अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्र्यांनी पांढरी आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
गुलाबी अन् पांढऱ्या रंगाच्या साडीतील लूक Nirmala Sitharaman Saree ।
प्रत्येक वेळी प्रमाणेच त्यांनी 2024 चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी साडीची निवड केली आहे. तिच्या साडीचा रंग पांढरा आणि गडद गुलाबी आहे. गुलाबी आणि पांढरे रंग संयोजन आणि निरागसत्याचे प्रतीक मानले जातात.त्यामुळे त्यांनी यंदाच्या साडीचा रंग पांढरा आणि गुलाबी निवडला आहे.
खास संदेश देणारी साडीचा दरवर्षी लूक Nirmala Sitharaman Saree ।
दरवर्षी अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करताना काही तरी संदेश देणारी साडी नेसतात. त्यांनी आजपर्यंत सादर केलेल्या सर्वच अर्थसंकल्पादरम्यानच्या साड्यांना विशेष महत्व देण्यात आले आहे. दरम्यान, मागील वर्षांतील निर्मला सीतारामनच्या बजेट लूकसाठी त्यांनी निळ्या हातमागाची साडी नेसली होती. निळा रंग शांतता आणि शक्तीचे प्रतीक आहे. तर २०२३मध्ये अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पासाठी लाल रंगाची साडी निवडली होती. पारंपारिक लाल रंग प्रेम, सामर्थ्य, शौर्य आणि वचनबद्धतेचे प्रतीक मानले जाते.
तर कोरोनाच्या काळात म्हणजेच 2021 मध्ये अर्थमंत्र्यांनी लाल बॉर्डर असलेली ऑफ-व्हाइट रंगाची साडी नेसली होती. हा रंग शांतता आणि शक्तीचे प्रतीक आहे. 2020 मध्ये अर्थमंत्र्यांनी पिवळी साडी नेसली होती. पिवळा रंग ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक आहे. हा अर्थसंकल्प भारतीय इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प होता जो 2 तास 42 मिनिटांचा होता.2019 मध्ये अर्थमंत्र्यांनी गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसली होती. गुलाबी रंग स्थिरता आणि गंभीरतेचे प्रतीक आहे.