नवी दिल्ली – देशातील मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज “उभरते सितारे’ फंडाची घोषणा केली. करोना विषाणूच्या साथीच्या काळात लघु उद्योगावर बराच परिणाम झाला आहे. हा परिणाम कमी करण्यासाठी ही उपाय योजना करण्यात आली आहे.
सितारामन म्हणाल्या की लघु उद्योगांची व्याख्या बदलण्यात आल्यामुळे या उद्योगाला भांडवल पुरवठा उपलब्ध होणे सोपे झाले आहे. लघुउद्योगाच्या ताळेबंद तपासणीमध्येही शिथिल धोरण अवलंबण्यात आले आहे.
प्रत्येक जिल्हय लघु उद्योग चेंबर स्थापन केल्यानंतर हे उद्योग विकसित होण्यास मदत होईल. असे त्यांनी लघुउद्योग मंत्रालयाला सांगितले. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात एखादे विशेष उत्पादन विकसित होण्यास मदत होईल.
“उभरते सितारे’ फंडामुळे लघु उद्योगातून निर्यात वाढण्यास मदत होईल. ज्या उद्योगात वाढण्याची क्षमता आहे, अशा उद्योगांना उभरते सितारे फंडातून आवश्यक ती मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.