नवी दिल्ली : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची 15 व्या वित्त आयोगाने भेट घेतली. आयोगाचे अध्यक्ष एन के. सिंग यांनी आयोगाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
गोव्याची लोकसंख्या 14 लाख 59 हजार आहे. तेथील लोकसंख्यावाढीचा दर दशकात 8.23 टक्के आहेत. तर प्रती चौरस किमीत 394 लोक राहतात. देशातील ही सरासरी 382 आहे. 62.17 टक्के लोक शहरी भागात राहतात.
गोव्यातील नागरीकांमध्ये 20 टक्के नागरिक स्थलांतरीत आहेत. गोव्याचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या अडीच पट आहे. राष्ट्री लोकसंख्या आयोगाने गोव्याला राहण्यासाठी सर्वोत्तम राज्य असा दर्जा दिला आहे.