कोल्हापूर – बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि प्रदीर्घ संघर्षानंतर कोल्हापूरकरांसाठी वंदे भारतची मागणी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत 16 सप्टेंबरपासून धावणार आहे. गेल्या आठवडाभरापासून पुणे हुबळी वंदे भारतला प्रस्तावित कोल्हापूर थांबा झाल्यानंतर वाद वाढला होता.
त्यानंतर कोल्हापूर सांगलीसह कर्नाटकमधील लोकप्रतिनिधी तसेच प्रवासी संघटनांनी हस्तक्षेप केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून कोल्हापूर ते पुणे आणि हुबळी ते पुणे अशा दोन स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दिला. येत्या सोमवारपासून म्हणजेच 16 सप्टेंबरपासून वंदे भारत धावणार आहेत.
असे असेल वेळापत्रक?
कोल्हापूर ते पुणेः प्रत्येक मंगळवार, शनिवार व सोमवारी
पुणे ते कोल्हापूरः प्रत्येक बुधवार, शुक्रवार व रविवारी
असा असेल मार्ग…
सकाळी ८.१५ः कोल्हापुरातून प्रस्थान
सकाळी ९ः मिरजेत आगमन
सकाळी ९.१५ः सांगली
सकाळी ९.४२ः किर्लोस्करवाडी
सकाळी १०.०७ः कराड
सकाळी १०.४७ः सातारा
दुपारी १.३०ः पुणे आगमन
हुबळी ते पुणे वंदे भारत कशी?
हुबळी ते पुणे वंदे भारत बुधवार, शुक्रवार व रविवारी पहाटे 5 वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल
पुणे ते हुबळी गुरुवार, शनिवार व सोमवारी दुपारी सव्वा दोनला सुटेल रात्री 10.45 वाजता हुबळीत पोहोचेल.
या गाडीला धारवाड , बेळगाव, मिरज ,सांगली, सातारा असे पाच थांबे आहेत.