अखेर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर दाखवले पांढरे झेंडे

भारतीय जवानांच्या गोळीबारात ठार झालेल्या जवानांचे घेतले मृतदेह

श्रीनगर : भारताने काश्‍मीरविषयीचे कलम 370 रद्द केले आणि भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. भारत सरकारच्या या निर्णयाचा पाकिस्तान वेगवेगळ्या पद्धतीने विरोध दर्शवत आहे. दरम्यान, नियंत्रण रेषेवर सतत गोळीबारदेखील पाकिस्तानकडून करण्यात येत आहे परंतु, पाकच्या हल्ल्याला आतापर्यंत भारतीय सैनिकांनी सडेतोड उत्तर देत त्यांच्या जवनांना ठार केले आहे. दरम्यान, गोळीबारात ठार झालेल्या जवानांना पांढरा झेंडा दाखवून घेवून जाण्याचे भारताने यापुर्वी अनेकवेळा म्हटले होते. मात्र त्यावेळी नकार देणाऱ्या पाकने आता नियंत्रण रेषेवर पांढरे झेंडे दाखवले आहेत.

जम्मू-काश्‍मीरच्या हाजीपूरमधील एक व्हिडीओ आता समोर आला आहे. हा व्हिडीओ 10 किंवा 11 सप्टेंबरचा आहे. या व्हिडीओत पाकिस्तानचे सैनिक पांढरे झेंडे दाखवून ठार झालेल्या आपल्या जवानांचे मृतदेह घेवून जात आहेत. पाकिस्तानच्या या कृतीतून आता दरवेळी नियंत्रण रेषेवर आपले सैनिक ठार झाले नसल्याचा पाक जो दावा करतो त्याचे स्वत:च पाकने खंडण केले असल्याचे सिद्ध झाले आहे. पांढरे झेंडे हे लष्कराच्या भाषेत आत्मसमर्पण किंवा युद्ध विरामाचे संकेत मानले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)