अखेर अमेरिकेचे तुर्कीवर निर्बंध

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अखेर तुर्कीवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विषयीच्या अधिसुचनेवर त्यांनी आज स्वाक्षरी केली.

तुर्कीने उत्तर सीरियावर जी लष्करी कारवाई केली त्याच्या वरील कारवाईच्या अनुषंगाने हीं कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार अमेरिकेच्या प्रशासनाने तुर्की मधील ज्या व्यक्तींवर निर्बंध लागू करण्यात येत आहेत त्यांची यादी जाहींर केली आहे.

त्या यादीत तुर्कीचे संरक्षणमंत्री हुलुसी अकर, अंतर्गत व्यवहार मंत्री सिुलेमान सोयलू, उर्जा मंत्री फतीह डोन्मेझ यांचा समावेश आहे. तुर्कीच्या लष्कराने सीरियावर जी कारवाई केली आहे त्यातून नागरीकांना आणि शांततेला धोका निर्माण झाला आहे.

तुर्कीच्या नेत्यांना जर विनाशाच मार्ग पत्करला असेल तर तुर्कीला आर्थिकदृष्ट्या संपवण्यासाठी मी चंगच बांधला आहे आणि त्यासाठी योग्य ती सज्जता ठेवली आहे असा इशारा ट्रम्प यांनी यावेळी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.