मुंबई : निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर गुरुवारी सकाळी स्थगित करण्यात आला आहे. याविषयीची घोषणा सेंट्रल मार्डने केली. मेस्मा दाखल करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर डॉक्टराना त्वरित सेवेत रुजू होण्यास सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री उशिरापर्यंत डिएमइआर सोबत झालेल्या बैठकीत 15 दिवसांत विद्यावेतनाचा मुद्दा निकालात काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर गुरुवारी सकाळीच सेवेत दाखल झाले.
Maharashtra Association of Resident Doctors (MARD) “temporarily calls off its agitation on humanitarian grounds until further notice” in view of the flood situation in the state & abrogation of Article 370 pic.twitter.com/Ip38YrclFa
— ANI (@ANI) August 8, 2019
दरम्यान, राज्यातील अनेक शहर उपनगरातील शासकीय, पालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे रुग्णालयांतील नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली होती. बुधवारी सकाळपासून निवासी डॉक्टरांनी आझाद मैदानात आंदोलन केले. जवळपास 300 जणांनी यात सहभाग घेऊन राष्ट्रीय वैद्यकीय विधेयक, विद्यावेतन वाढ, आजारी निवासी डॉक्टरांना रजा मंजूर करावी या प्रमुख मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू राहील, अशी भूमिका मार्डने घेतली होती.