अखेर… ‘दिशा पाटणी’च्या सौंदर्याचे रहस्य उलगडलं; ‘हे’ आहेत घरगुती फंडे

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पाटणी’ ही तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त हॉट अँड बोल्ड लूकसाठीही ओळखली जाते. दिशाचा बोल्ड लूक नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतो. दिशा पाटणी ची ट्विटर आणि इंस्टाग्रामवर चांगलीच लोकप्रिय आहे. तिने बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे.

 

दिशाचे फोटो खूप हॉट असतात खासकरून तिचे बीचवरील बिकिनी फोटो सोशल मीडियावरील वातावरणच बदलून टाकतात. सोशलवर दिशाचा सुंदर आणि  सेक्सी स्टाईलची नेहमीच चर्चा रंगत असते. दिशाचे फॅन्स सुद्धा तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.

दिशा पाटणी आपल्या हेल्थ कडे विशेष लक्ष देते. दिशा नेहमीच माध्यमांवर आपल्या ग्लोईंग स्किनचे फोटो टाकते आणि आपल्या ग्लोईंग स्कीनचं सिक्रेट काय आहे याबाबत नेहमी सांगते. दिशा आपली सुंदर फिगर आणि सेक्सी स्टाईलसाठी काय करते या मागचं गुपित आम्ही तुम्हाला सांगणार आहोत….

दिशा पटानीने आपल्या सुंदरतेमागे घरगुती उपायांचा हात आहे असं सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत दिशाच्या सुंदरतेचे खास घरगुती फंडे. दिशा आपली त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी खूप पाणी पिते. आपली बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी दिशा दररोज ८ ते १० ग्लास पाणी पिते. तसंच दिशा बाहेरचं खाणं शक्यतो टाळते. 

दिशा त्वचेला चांगलं ठेवण्यासाठी क्लिजरचा वापर करते. कारण ग्लोईंग स्किनसाठी मॉईश्चराईज करणं गरजेचं आहे. आपल्या त्वचेला पोषण मिळण्यासाठी आणि हेल्दी ठेवण्यासाठी दिशा दुधाची साय त्वचेला लावून त्वचा चांगली ठेवते. आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करते. दिशा फिगर चांगली ठेवण्यासाठी रोज योगा करते. त्यामुळे तीची बॉडी अत्यंत वेलशेप्ड असते.

दिशा आपल्या केसांसाठी बदामाच्या तेलाचा वापर करते. त्यामुळे तिचे केस अतिशय चमकदार आणि सुंदर आहेत. आपल्याला सगळ्यांनाच बदामाच्या तेलातील पोषक घटकांबद्दल माहित आहे. दिशा याचा वापर करून आपले केस सुंदर ठेवते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.