मुंबई – ब्रम्हास्त्र’ या सिनेमाची रिलीज डेट पुन्हा एकदा बदलली आहे. पुढच्या वर्षी हिवाळ्याच्या सुटीमध्येच या सिनेमाचा आनंद घेणे प्रेक्षकांना शक्य होईल अशा चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. यातच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे शूटिंग जवळपास संपले आहे. आता त्याचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. अशी ही चर्चा सुरु होती.
काही युजर्सने तर हा थिएटरला बघण्यासाठी प्रेक्षकांना आता खूप वाट बघायला लागू शकते, अशा पोस्टही शेअर करत शक्यता वर्तविली होती. या चित्रपटाचा रिलीज डेटवरून स्वतःहा बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक अयान मुखर्जीला प्रश्न विचारला आहे.
दरम्यान,अयान मुखर्जीचा ‘ब्रम्हास्त्र’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या चित्रपटावरुनच अमिताभ यांनी अयानला आव्हान दिले आहे.
अमिताभ म्हणाले, “ब्रम्हास्त्र या वर्षी चार डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. आता अयान मुखर्जीला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याची परवानगी नाही.” चित्रपट ठरलेल्याच दिवशी प्रदर्शीत करण्याचे आव्हान बिग बींनी आपल्याच चित्रपटाच्या दिग्दर्शकाला दिले आहे.