अखेर मुहूर्त ठरला.! ‘या’ दिवशी विकी-कतरिनाच्या डोक्यावर पडणार अक्षता….

मुंबई – बॉलीवूड गॉसिप कट्ट्यावर सध्या रणबीर-आलिया आणि कतरिना-विकीच्या लग्नाचीच चर्चा होत असते. रणबीर-आलियाच्या लग्नाच्या डझनभर अफवा पसरल्या आहेत. आता त्यातील स्वारस्य निघून गेले आहे. 

मात्र, कतरिना-विकीच्या लग्नाचे तसे झालेले नाही. या दोघांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. 9 डिसेंबरला राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्‍स सेन्सेस फोर्ट बरवारा रिसॉर्टमध्ये 

हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. हिंदू रितीरिवाजांप्रमाणे हा विवाह सोहळा होणार आहे. 9 तारखेच्या लग्नाच्या पूर्वी 7 आणि 8 डिसेंबरला संगीत आणि मेंदीचा समारंभ देखील होणार आहे.

सगळी तयारी झाली आहे आणि आता दोन्ही घरचे पाहुणे विवाहस्थळी जाण्यासाठी सामानाची बांधाबांध करायला लागले आहेत. या विवाह सोहळ्यामध्ये बॉलीवूडमधील तमाम सेलिब्रिटी मंडळी हजेरी लावणार आहेत, हे तर नक्की आहे. 

याशिवाय हॉलीवूडमधील कलाकार मंडळीही येणार आहेत. या लग्नासाठी नवरा-नवरी कोणती वेशभूषा करणार आणि त्यांच्या या विवाहात काय काय तयारी झाली आहे, असे बरेच अपडेट हळूहळू मिळायला सुरुवात झाली आहे. ते सगळे लवकरच वाचकांना सांगितले जाईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.