मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे संजय लीला भंसाली यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. भंसाली यांनी आपल्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये लीड रोलसाठी आलियाला कास्ट केले असून, लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
Sanjay Leela Bhansali commences shooting of his new film #GangubaiKathiawadi… Stars #AliaBhatt in title role… 11 Sept 2020 release. pic.twitter.com/OZ5jWCGcM8
— taran adarsh (@taran_adarsh) December 27, 2019
गंगूबाई चित्रपटाच्या कथानकावर मागील बऱ्याच दिवसापासून काम सुरू होते. अखेर या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी ११ सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. आलियाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही आपल्याला सान्ताक्लॉजने दिलेली भेट असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, या भूमिकेसाठी प्रियांका चोप्रालाही कास्ट करण्यात येणार होते. परंतु भंसाली यांना या भूमिकेसाठी राणी मुखर्जी ही सर्वप्रथम पसंती होती. परंतु राणीसोबत न जुळल्याने त्यांनी प्रियांकाशी चर्चा केली होती.