अखेर रवी पुजारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मुंबई – कुख्यात गुंड रवी पुजारीला मुंबईत आणण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले आहे. बंगळुरू न्यायालयाकडून मुंबई पोलिसांनी त्याचा ताबा घेतला असून उद्या किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

रवी पुजारीला खंडणीच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पाच वर्षांपूर्वी मुंबईतल्या विलेपार्लेत खंडणीसाठी रवी पुजारीने एकाच्या हत्येचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात रवी पुजारीवर गुन्हाही दाखल झाला होता. मुंबईत रवी पुजारीवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

अनेक वर्षांपासून फरार असलेला रवी पुजारीसा गतवर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेतील सेनेगलमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेच्या मदतीने बंगळुरू पोलिसांनी अटक केली होती. दक्षिण आफ्रिकेबरोबर प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता कर्नाटक पोलिसांकडून त्याचा ताबा घेऊन मुंबई पोलीस मुंबईत घेऊन आले आहेत.

दरम्यान, 2016 मध्ये विलेपार्ले येथील हॉटेल गजाली येथे खंडणीसाठी आलेल्या त्याच्या साथीदाराने एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने 8 जणांना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. मुख्य फरार असलेला आरोपी रवी पुजारीला ताब्यात घेण्यासाठी खंडणीविरोधी पथकाने न्यायालयात प्रत्यार्पणचा अर्ज दाखल केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.