हृतिक रोशनच्या “मोहेंजोदडो’ चित्रपटातून धमाकेदार सुरुवात करणारी अभिनेत्री पूजा हेगडे सतत कोणत्या-न-कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. पुजा लवकरच साउथ सुपरस्टार प्रभाससोबत “राधेश्याम’मध्येही झळकणार आहे. दरम्यान, पूजा हेगडेने आपल्या कुटुंबीय आणि आपल्या अभिनयाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
View this post on Instagram
पूजा हेगडे म्हणाले, माझे कुटुंबीय हे माझ्या अभिनयाबाबत खूपच वेगळ्या पद्धतीने व्यवहार ठेवत असतात. मी जर माझ्या अभिनयाचा एखाद्या व्हिडिओ जर कुटुंबीयांच्या व्हॉटस् ऍप ग्रुपवर टाकल्यास अनेकवेळा मला असे करणे योग्य नसल्याचे सांगितले जाते. पण मी फक्त जे परफेक्ट व्हिडिओ आहेत, असेच व्हिडिओ ग्रुपवर शेअर करत असते.
View this post on Instagram
पूजा म्हणाली, अनेकवेळा मी माझ्या शूटिंगचे व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यावर कोणतीही रिऍक्शन देत नाहीत आणि त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. पूजा हेगडेचा हा खुलासा सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला असून यावर चाहत्यांनी असंख्य कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास पूजा सध्या आपल्या आगामी “कभी ईद, कभी दिवाली’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान मुख्य भूमिका साकारणार आहे. याशिवाय ती “राधेश्याम’मध्ये सुपरस्टार प्रभाससोबत स्क्रीन शेअर करत आहे.
View this post on Instagram