अखेर पी.चिदंबरम यांना जामीन मंजूर

जामीन मिळूनही 24 तारखेपर्यंत राहणार तुरूंगात

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया प्रकरणातील आरोपी आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. परंतू, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असला तरी त्यांना आताच तुरूंगाबाहेर येता येणार नाही.

आयएनएक्‍स मीडिया प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. चिंदबरम यांच्या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना 1 लाखाच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, न्यायालयाने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

तसेच अन्य कोणत्याही प्रकरणात चिदंबरम यांच्या चौकशीची गरज नसेल तर त्यांना जामिन मंजूर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.एवढेच नाही तर त्यांना परवानगीशिवाय देश सोडून जाता येणार नाही.

या प्रकरणाची सीबीआय आणि ईडी संयुक्‍तपणे चौकशी करत आहेत. त्यामुळे चिदंबरम यांना आज मिळालेल्या जामीनाचा लगेच फायदा होणार नाही. कारण चिदंबरम यांची 24 ऑक्‍टोबरपर्यंत ईडीच्या ताब्यात चौकशीसाठी असणार आहेत. त्यामुळे 24 तारखेपर्यंत चिदंबरम हे तुरूंगातच असणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.