अखेर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ‘बंद’ मागे

मुंबई: मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण व इतर मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरु आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांनी राज्यात मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बंदची हाक दिली होती. त्यामुळे या मोर्च्याने हिंसक वळण घेतले होते.

अखेर आज दुपारी अडीचच्या सुमारास हा बंद मागे घेण्यात आल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी जाहीर केलं. सोमवारी काकासाहेब शिंदे या आंदोलकाने जलसमाधी घेतल्याने आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले. मंगळवारी दादरच्या शिवाजी मंदिर येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीत मुंबई बंदचा निर्णय घेण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)