मुंबई – अक्षय कुमारने त्याच्या “अतरंगी रे’ चे शुटिंग संपवले आहे. या सिनेमातील आपले सहकलाकार सारा अली खान आणि धनुष यांना धन्यवाद देणारी एक पोस्ट त्याने लिहीली आहे. त्याशिवाय “अतरंगी रे’मधील जादूगाराच्या गेटअपमधील आपला फर्स्ट लुक देखील अक्षयने शेअर केला आहे.
या फोटोमध्ये अक्षय काळा सूट आणि उंच हॅट घातलेल्या जादूगाराच्याअ वेशभुषेत दिसतो आहे. त्याने त्याच्या पालथ्या हातामध्ये पत्त्यांमधील बदामचा राजा धरलेला दिसतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर मिश्कील् हास्य झळकलेले दिसते आहे. अक्षयने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये “अतरंगी रे’च्या शुटिंगला सुरुवात केली होती. लखनौ आणि उत्तर प्रदेशात “अतरंगी रे’चे शुटिंग झाले.
या फुल्ल कॉमेडी सिनेमाचे डायरेक्शन आनंद एल राय यांनी केले आहे. बऱ्याच दिवसांनी ए.आर. रेहमानचे म्युझिक “अतरंगी रे’च्या निमित्ताने प्रेक्षकांना ऐकयला मिळणार आहे. अक्षयबरोबर धनुषच्या अभिनयाची जुगलबंदीही पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. या दोघांच्या बरोबर सारा अली खानही कॉमेडीचा तडका वाढवताना दिसणार आहे.