पुणे – बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशलच्या अफेअरविषयी अनेक वर्षांपासून चर्चा आहे. या दोघांनाही बऱ्याचदा डेटिंग आणि एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. मात्र, दोघांनीही याविषयी बोलण्याचे सातत्याने टाळले आहे. पण आता कतरिना कैफमुळे हे गुपीत समोर आले आहे. कतरिना कैफने इंस्टास्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात नको असतानाही विक्की कौशल दिसत आहे.
सध्या कतरिना कैफने इंस्टास्टोरीवर शेअर केलेला फोटो खूपच व्हायरल होत आहे. या फोटोत तिची बहीण इसाबेल कैफ कतरिना कैफच्या शेजारी बसलेली दिसत आहे. पण कतरिनाच्या मागे असलेल्या आरशामध्ये विक्की कौशल स्पष्टपणे दिसत आहे. जेव्हा ग्लासमध्ये तिची झलक दिसली तेव्हा विक्की कौशल कतरिनासमोर बसले होता, हे उघड होते.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास कतरिना कैफ लवकरच “फोन भूत’ या चित्रपटात ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत झळकणार आहे. तसेच अक्षय कुमारसोबतचा तिचा “सूर्यवंशी’ चित्रपटदेखील रिलीजसाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे विक्की कौशलहा सॅम मानेकशॉ यांच्या जीवनावर आधारित असलेल्या बायोपिकमध्ये काम करत आहे. याचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहे.