मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल या दोघींना वांद्रे पोलिसांनी 23 नोव्हेंबर तर रंगोलीला 24 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, कायदेशीर पळवाटा शोधून राणावत भगिनी तारखा टाळण्यात आल्या होत्या. अखेर आज कंगना आणि तिच्या बहिणीला वांद्रे पोलीस ठाण्यात जाणे भागच पडलं आहे.
Mumbai: Actor Kangana Ranaut and her sister Rangoli appear before Bandra Police to record their statements, in connection with a sedition case pic.twitter.com/ACkLgBXARA
— ANI (@ANI) January 8, 2021
प्रक्षोभक वक्तव्ये करून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भिन्न समुदायांत विद्वेष निर्माण करत असल्याचा दोन्ही भगिनींवर आरोप आहे. कंगना आणि रंगोली यांनी मागील काही काळात बॉलीवूडसंदर्भात केलेले अनेक ट्विट वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या या ट्विट मुळे अनेक राजकीय वाद सुद्धा निर्माण झाले.
Why am I being mentally, emotionally and now physically tortured? I need answers from this nation…. I stood for you it’s time you stand for me …Jai Hind 🙏 pic.twitter.com/qqpojZWfCx
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 8, 2021
दरम्यान, चौकशीसाठी जाण्याअगोदर कंगनाने पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. “जेव्हा पासून मी देशाच्या हिताचा विचार करत आहे. तेव्हापासून माझ्यावर अत्याचार आणि माझे शोषण केले जात आहे. माझे घर तोडले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी हसल्यामुळेही माझ्यावर एक केस झाली आहे. माझ्या बहिणीने कोरोनाच्या काळात डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराविरूद्ध आवाज उठवला होता त्यावरही गुन्हा दाखल केला होता. त्या केसमध्ये माझे नावही टाकण्यात आले’, असं कंगनाने व्हिडिओत सांगितलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून द्वेष वाढवला आहे. धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. मोहम्मद इकबाल सैयद असं याचिकाकर्त्याचे नाव आहे.