जान्हवी कपूरने आपल्या “गुड लक जेरी’ या आगामी सिनेमाचे शुटिंग संपवले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ती या सिनेमाचे शुटिंग पंजाबमध्ये करत होती. इन्स्टाग्रामवरच्या आपल्या पोस्टमध्ये जान्हवीने सेटवरचे काही फोटो पोस्ट केले आहेत आणि टीमला धन्यवादही दिले आहेत.
या शुटिंग दरम्यान खूप घडामोडी घडल्या. सेटवरच्या सगळ्यांना मी खूप त्रास दिला, खूप काही शिकले आणि बऱ्याच गोष्टींमध्ये बदलही घडवून आणला, असे जान्हवीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये “गुड लक जेरी’चे डायरेक्टर सिद्धार्थ सेनगुप्ता आणि संपूर्ण युनिटचे सदस्य दिसत आहेत. याच सिनेमाच्या सेटवर जान्हवीचा वाढदिवस देखील साजरा झाला होता.
आता “गुड लक जेरी’चे शुटिंग संपले आहे. त्यामुळे जान्हवी आपली धाकटी बहिण खुशीला घेऊन लॉस एंजेलिसला जाणार आहे. तिथे खुशीला ऍक्टिंग इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेऊन देणार आहे. खुशीच्या करिअरच्या दृष्टीने या ऍक्टिंग इन्स्टिट्युटमधील अभ्यास महत्वाचा आहे, असे जान्हवी आणि सगळ्या कपूर खानदानाचे म्हणणे आहे.