अखेर जॅकलीन फर्नांडिस ईडीसमोर चौकशीला हजर

मुंबई  – मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी जॅकलीन चौथ्यांदा गैरहजर राहिली होती.

ईडीकडून चार वेळा समन्स बजावल्यानंतर बुधवारी जॅकलीन फर्नांडिस चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाली आहे. यापूर्वी 25 सप्टेंबर, 15 ऑक्‍टोबर, 16 ऑक्‍टोबर आणि 18 ऑक्‍टोबरला जॅकलीनला ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, चार वेळा समन्स बजावूनही जॅकलीन चौकशीसाठी उपस्थित राहिली नाही.

यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी जॅकलीनची दिल्लीत 6 तास चौकशी करण्यात आली होती. सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस यांचे मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) जबाब नोंदवला जात आहे. या प्रकरणात जॅकलीन साक्षीदार आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाला आहे का नाही, याची तपासणी करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.