मुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या स्टंटवर आधारित शो ‘खतरों के खिलाडी’ साठी ओळखला जातो. रोहित शेट्टी ‘खतरों के खिलाडी 13’ घेऊन येत आहे. ज्याचा खुलासा त्याने बिग बॉस 16 च्या फिनालेमध्ये केला होता. ‘खतरों के खिलाडी’च्या नव्या सीझनमुळे रोहित खूप चर्चेत आहे.
यावेळी नव्या सिझनमध्ये कोण दिसणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तर, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे मिळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या शो मध्ये मुनवर फारूकशी संपर्क साधण्यात आला आहे. मात्र, त्याच्या कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
त्याचबरोबर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर या शोसाठी अर्चना गौतमचेही नाव पुढे येत आहे. अर्चनाही रोहित शेट्टीच्या शोमध्ये सहभागी होणार असल्याचे समजते. तसेच, बिग बॉस फेम प्रियंका चहर चौधरीने देखील या शोचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली. तर, या दोघांशिवाय बिग बॉस 16 चा उपविजेता शिव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाचे शूटिंग मे महिन्याच्या मध्यावर केले जाणार आहे. जे 55 ते 60 दिवस केले जाईल. गेल्या वर्षी ‘खतरों के खिलाडी’ 2 जुलै 2022 रोजी सुरू झाला होता, अशा परिस्थितीत यावेळेसही हा शो जुलैमध्येच सुरू होईल असे देखील सांगण्यात आलं आहे.