कोल्हापूर: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थ्यांच्या कडून शिवमहोत्सव 2020 या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करणारे ह भ प निवृत्ती इंदूरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता परंतु कोल्हापुरातील पुरोगामी संघटनांनी केलेल्या विरोधामुळे इंदुरीकर महाराजांनी कोल्हापूरचा दौरा रद्द केलाय खरा मात्र शिव महोत्सव ठरल्या प्रमाणे होणार आहे…
गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहेत ते म्हणजे हभप निवृत्ती इंदुरीकर महाराज… त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे ते प्रचंड चर्चेत आले अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ नागरिक उभे राहिले तर विरोधात काही ही संघटनांनी मोट बांधली परंतु इंदुरीकर महाराज आपला दौरा महाराष्ट्रभर अखंडित करत आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थ्यांच्या कडून शिवमहोत्सव 2020 चे आयोजन करण्यात आलेल आहे. या शिव महोत्सवात वादग्रस्त वक्तव्य करणारे इंदूरीकर महाराज यांचं कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कीर्तनाच्या कार्यक्रमाला कोल्हापुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समिती सह इतर पुरोगामी संस्थांनी तीव्र विरोध केला आहे तर इंदूरीकर महाराजांचा कार्यक्रम समर्थनार्थ युवा सेनेसह इतर हिंदुत्ववादी संघटना उतरल्या आहेत.
शिवाजी विद्यापीठातील पदवीदान समारंभ होणाऱ्या सभागृहात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आलेल आहे आणि याच कार्यक्रमस्थळी विरोध करण्यासाठी अंनिसच्या सीमा पाटील आणि अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले या दाखल झाल्या होत्या तर इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ युवा सेनेचे मनजीत माने दाखल झाले होते इंदुरीकर महाराजांच्या कोल्हापूरचा कार्यक्रमावरून अंनिस आणि हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. अनिस ने या कीर्तनाचा कार्यक्रमाला विरोध केला आहे तर हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी युवासेना आपली फौज उभी करणार आहे.
इंदूरीकर महाराज यांना अंनिस सह इतर पुरोगामी संघटनांचा विरोध आणि हिंदुत्ववादी संघटनांचा समर्थन होतं. इंदुरीकर महाराजांच्या या कार्यक्रमाच्या आयोजन आवरून सुरू झालेला वाद हा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या दालना पर्यंत पोहोचला इथे दोन्ही संघटनांनी आपलं म्हणणं कुलगुरु समोर मांडलं . आणि आयोजकांची बोलून आपण यावरती निर्णय देऊ असं त्यांनी सांगितलं
अखेर काही वेळातच या कार्यक्रमाचे आयोजक असणारे प्रवीण कोडोलीकर यांनी इंदुरीकर महाराज कोल्हापूरला वेळेच्या कारणास्तव येणार नसल्याचं सांगून दौरा रद्द झाला असल्याचं स्पष्ट केलं
इंदूरीकर महाराज यांच्यावरून कोल्हापुरात सकाळपासून निर्माण झालेला तणाव अखेर त्यांचा दौरा रद्द झाल्याने सध्यातरी निव्वळ आहे मात्र इंदुरीकर यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्य वरती जाहीर माफी मागितली असताना आत्ता त्यांना विरोध करणं हे कितपत योग्य आहे आहे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे