पेट्रोल, डिझेल दरवाढीवर अखेर अर्थमंत्री सीतारामण यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

नवी दिल्ली – देशात पेट्रोल आणि डिझेलची मोठी दरवाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी सामान्यांकडून करण्यात येत आहे. तर विरोधक देखील आक्रमक झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीसाठी आधीचं सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होते. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इंधन दरवाढ एक गंभीर मुद्दा आहे, ज्यामध्ये किंमत कमी करण्याव्यतिरिक्त कोणतचं उत्तर देणं योग्य नाही. केंद्र आणि राज्यांनी दोन्ही पातळींवर ग्राहकांसाठी इंधन दरांमध्ये कमतरता आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असं निर्मला सीतारामण यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, ओपीईसी देशांनी उत्पादनाचं जे अनुमान लावलं होतं, तेदेखील खाली येण्याची शक्यता आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. तेलाच्या किंमतींवर सरकारचं नियंत्रण नाही, ते तांत्रिकदृष्ट्या मुक्त करण्यात आले आहे. तेल कंपन्या कच्चं तेल आयात करतात, रिफाइन करतात आणि विकतात, असंही त्यांनी सांगितले.


देशात मागील काही दिवसांपासून सतत इंधन दरवाढ होत आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर मुंबईत ९७ रुपये प्रतिलिटरवर पेट्रोल दर पोहोचले आहे. यामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही प्रमाणात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.