अखेर ठरलं..! ‘या’ दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ‘रायगड’ला भेट देणार; संभाजीराजेंनी सांगितली तारीख

मुंबई – देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुढील महिन्यात स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते.

ते निमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले असून, पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत. स्वतः संभाजी राजेंनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

“राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि.7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.” या आशयाचे ट्विट खासदार संभाजी राजेंनी केलं आहे.

दरम्यान, यापूर्वी 5 जानेवारी 20214 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी रायगडाला भेट दिली होती. नरेंद्र मोदी यावेळी प्रथमच रायगडच्या दौऱ्यावर आले होते. आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगड दौरा करणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.