पुणे – लॉकडाऊन काळात करण्यात आलेल्या कठोर उपाययोजनांमुळे बुधवार पेठ हा दाट वस्तीचा भाग करोना संसर्गापासून मुक्त राहिला होता. मात्र, लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच या परिसरातही करोनाचा शिरकाव झाला असून, परिसरात खाद्यपदार्थाचे व्यवसाय करणाऱ्या एका वृद्धेला करोनाची लागण झाल्याने परिसरातील संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
येथील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना करोनाची लागण झाल्याची माहिती लाइफ फोर्सिस हेल्फ फाऊंडेशनचे हमीद हानिफ यांनी दिली. याबाबत क्षेत्रीय कार्यालय अधिकाऱ्यांनीशी संपर्क साधला, असता तो होऊ शकला नाही.