अखेर मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला सिद्धुचा राजीनामा

चंदीगड – पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी राज्यमंत्रीमंडळातील मंत्री नवज्योतसिंग सिद्धु याचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांनी तो राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मुख्यमंत्री बुधवारी दिल्लीच्या दौऱ्यावर होते. तेथून परत आल्यानंतर ते दोन दिवस आजारी होते. त्यामुळे त्यांनी रविवारी सकाळी त्यांचा राजीनामा वाचला. आणि आज त्यांनी तो राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवून दिला.

मुख्यमंत्री व सिद्धु यांच्यात पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीने तडजोड झाली असल्याने त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने ही कृती केली. सिद्धु यांच्या खात्यामध्ये जो बदल करण्यात आला, तो त्यांना पसंत नव्हता. तेव्हापासून सिद्धु यांची मुख्यमंत्र्यांशी खडाजंगी सुरू होती. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभारही स्वीकारला नव्हता.

सिद्धु यांच्याकडील स्थानिक स्वराज्य संस्था, पर्यटन, आणि सांस्कृतीक कार्य ही खाती काढून घेण्यात आली होती व त्यांच्याकडे उर्जा खाते सोपवण्यात आले होते. पण महिनाभर त्यांनी या खात्याचा कारभारच स्वीकारला नव्हता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. गेल्या ल14 जुलैला स्वता सिद्धु यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा ट्विटरवर केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)