मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर चौफेर टीका होत आहे. 9 सप्टेंबर कंगना राणावतने ट्वीटमध्ये सांगितल्याप्रमाणे आज ती मुंबईत दाखल होणार आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेसह कंगना लवकरच चंदीगड एअरपोर्टहून मुंबईला येणार आहे.
दरम्यान, कंगना मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडला आहे. पालिकेने सकाळी 11 वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली.
Pakistan…. #deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
काल मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयाबाहेर नोटीस लावली होती. ‘कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून, रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होत’. कंगनाच्या या ऑफिसची किंमत जवळपास 48 कोटी असल्याचे म्हटले जाते.
I am never wrong and my enemies prove again and again this is why my Mumbai is POK now #deathofdemocracy 🙂 pic.twitter.com/bWHyEtz7Qy
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
या पार्श्वभूमीवर कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये कंगनाने ऑफिसला राम मंदिराची उपमा देत बीएमसीची तुलना बाबराशी केली, नंतर तिने थेट पाकिस्तान असं लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात तिने केला.
मणिकर्णिका फ़िल्म्ज़ में पहली फ़िल्म अयोध्या की घोषणा हुई, यह मेरे लिए एक इमारत नहीं राम मंदिर ही है, आज वहाँ बाबर आया है, आज इतिहास फिर खुद को दोहराएगा राम मंदिर फिर टूटेगा मगर याद रख बाबर यह मंदिर फिर बनेगा यह मंदिर फिर बनेगा, जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम 🙏 pic.twitter.com/KvY9T0Nkvi
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
मणिकर्णिका फिल्म्सच्या कार्यालयात पहिला चित्रपट ‘अयोध्या’ जाहीर झाला. माझ्यासाठी ही इमारत नाही, तर एक राम मंदिर आहे, आज बाबर तिथे आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल. पुन्हा राम मंदिर पाडले जाईल, पण बाबर, हे लक्षात ठेव, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम…’ अश्या आशयाचे ट्विट कंगनाने केलं आहे.
As I am all set for Mumbai Darshan on my way to the airport,Maha government and their goons are at my property all set to illegally break it down, go on! I promised to give blood for Maharashtra pride this is nothing take everything but my spirit will only rise higher and higher. pic.twitter.com/6lE9LoKGjq
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
No work being carried out by Kangana Ranaut in her premises as falsely understood by you, so the notice issued by you as “Stop Work Notice” is absolutely bad-in-law & appears to have been issued only to intimidate her by misusing your dominant position: Kangana Ranaut’s lawyer https://t.co/qVDRL64MwF pic.twitter.com/HCNxNfZYd1
— ANI (@ANI) September 9, 2020